Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या ‘सातबारा कोरा यात्रे’ मनसेचे बाळा नांदगावकरसहभागी होणार

Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या ‘सातबारा कोरा यात्रे’ मनसेचे बाळा नांदगावकरसहभागी होणार

| Updated on: Jul 10, 2025 | 4:37 PM

MNS Supports Bachchu Kadu Protest : मनसेने बच्चू कडू यांच्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला पाठिंबा दिलेला आहे.

मराठी भाषेच्या लढ्याला पाठिंबा दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला समर्थन जाहीर केले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर गुरुवारी, 10 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयोजित या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नांदगावकर प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाने दिली आहे.

या यात्रेची सुरुवात 7 जुलै रोजी देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून झाली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा उंबर्डा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशा गावांमधून मार्गक्रमण करत चिलगव्हाण येथे साहेबराव करपे यांच्या गावी समाप्त होणार आहे, जिथे देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. सुमारे 138 किलोमीटरच्या या यात्रेत शेतकरी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी ते करत आहेत.

Published on: Jul 10, 2025 04:37 PM