अयोध्येसंदर्भात मनसेची थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी, बाळासाहेबांचं नावं घेत काय लिहिलं पत्र?
समस्त हिंदूना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस आता प्रत्यक्षात येत असल्याने उत्सुकता आहे. अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्टेशनच उद्घाटन 30 डिसेंबरला झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोठी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी करण्यात येत आहे. तर समस्त हिंदूना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस आता प्रत्यक्षात येत असल्याने उत्सुकता आहे. अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्टेशनच उद्घाटन 30 डिसेंबरला झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोठी मागणी करण्यात आली आहे. मनसेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मनसेचे उपाधक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अयोध्येतील प्रमुख चौकाला देण्याची मागणी केली आहे.
