Maharashtra Mansoon : 2 दिवस राज्याला झोडपणारा पाऊस 5 जूनपर्यंत सुट्टीवर?

Maharashtra Mansoon : 2 दिवस राज्याला झोडपणारा पाऊस 5 जूनपर्यंत सुट्टीवर?

| Updated on: May 28, 2025 | 12:27 PM

Maharashtra Mansoon Updates : रशियावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातला मान्सून आता 5 जूनपर्यंत विश्रांती घेणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जूनपर्यंत रखडण्याची शक्यता आहे. राज्याला 2 दिवस तूफान झोडपून काढणारा पाऊस आता विश्रांतीवर गेलेला आहे.

रशियावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातला मान्सून आता 5 जूनपर्यंत रखडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. गेले 2 दिवस राज्यातल्या अनेक भागांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. 27 मे रोजी रशियावर जास्त दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा अरबी समुद्र मार्गे भारतात येणार असल्याचा अंदाज आहे. 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सूनने 8 दिवस आधीच राज्यात दमदार आगमन केलं आहे. त्यातच आता रशियातल्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे आता मान्सून विश्रांतीवर जाण्याची चिन्हं असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

Published on: May 27, 2025 06:01 PM