Atidya Thackeray : भ्रष्ट सरकारच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

Atidya Thackeray : भ्रष्ट सरकारच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

| Updated on: May 25, 2025 | 6:05 PM

Aditya Thackeray News : आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली आहे. तसंच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर देखील त्यांनी भाष्य केलं.

पावसाळा सुरू झाला आहे पण रस्त्याचे काम असो किंवा नाल्याची सफाई असो, ते झालेले नाही, फक्त भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्ट सरकारच्या लोकांच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला आहे, असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, चर्चा एका बाजूने नव्हती तर दोन्ही बाजूंनी होती, पण चर्चा फक्त प्रेसमध्ये होती. आणि आम्ही म्हटले आहे की जर ते महाराष्ट्राच्या हिताचे, समाजाच्या हिताचे, देशाच्या हिताचे असेल, तर महाराष्ट्रविरोधी, भाजपविरोधी, मुंबईविरोधी असलेल्या या भ्रष्ट सरकारविरुद्ध स्वच्छ मनाने आमच्यात सामील होऊ इच्छिणाऱ्यांनी, तर आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करतो, असंही यावेळी ठाकरेंनी म्हंटलं आहे.

Published on: May 25, 2025 06:05 PM