भाजप आमदार मेघना बोर्डिकरांनी फाईलमध्ये पैसे ठेवले? सभागृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार मेघना बोर्डिकरांनी फाईलमध्ये पैसे ठेवले? सभागृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 12, 2024 | 4:36 PM

भाजप आमदार मेघना बोर्डिकर यांचा विधानसभेच्या सभागृहातील आजचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये भाजप आमदार राजेश पवार हे सभागृहात बोलत असताना त्यांच्या मागे भाजप आमदार मेघना बोर्डिकर बसलेल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये...

विधानसभेच्या सभागृहातला भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. असं असताना भाजप आमदार मेघना बोर्डिकर यांचा विधानसभेच्या सभागृहातील आजचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये भाजप आमदार राजेश पवार हे सभागृहात बोलत असताना त्यांच्या मागे भाजप आमदार मेघना बोर्डिकर बसलेल्या आहेत. राजेश पवार बोलताना पाठीमागे असलेल्या मेघना या एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण त्यांनी फाईलमध्ये पैसे नेमके का ठेवले? असा प्रश्न या सध्या उपस्थित केला जात आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मेघना बोर्डिकर यांचा खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.

Published on: Jul 12, 2024 04:35 PM