Mahim Police Colony: माहीम पोलीस कॉलनीत “गढुळाचं पाणी!”

Mahim Police Colony: माहीम पोलीस कॉलनीत “गढुळाचं पाणी!”

| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 11:34 AM

पाणी फक्त 10 मिनिटेच येत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. इतक्या कमी कालावधीत येणारं पाणीही बराच वेळ आधी गढूळ येतं अशीही इथल्या नागरिकांची तक्रार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी...

मुंबई: पाणी फक्त 10 च मिनीटे येतं आणि तेही गढूळ! मुंबईच्या (Mumbai) लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलीसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य आता राम भारोसे असल्याचं चित्र सध्या माहीम पोलीस कॉलनी मध्ये दिसत आहे. माहिम पोलिस कॉलनीत (Mahim Police Colony) पोलीस कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माहीम पोलीस कॉलनी मध्ये गढूळ पिण्याचे पाणी येत आहे ज्यामुळे पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासंदर्भात (Health) आता प्रश्न निर्माण झालाय. पाणी फक्त 10 मिनिटेच येत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. इतक्या कमी कालावधीत येणारं पाणीही बराच वेळ आधी गढूळ येतं अशीही इथल्या नागरिकांची तक्रार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी…