Mumbai Avighna Fire | अविघ्न टॉवरच्या सुरक्षा रक्षकांची अरेरावी, मीडिया प्रतिनिधींना धक्काबुक्की
मुंबईतील करी रोड परिसरातील अविघ्न वन इमारतीला आग लागली होती. आग लागलेल्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या पत्रकारांशी इमारतीच्या खासगी सुरक्षांनी अरेरावी केली.
मुंबईतील करी रोड परिसरातील अविघ्न वन इमारतीला आग लागली होती. आग लागलेल्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या पत्रकारांशी इमारतीच्या खासगी सुरक्षांनी अरेरावी केली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाला रोखणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. जेव्हा मीडिया येतो त्यावेळी त्यांच्यावर हात उचलनं योग्य नाही. त्या व्यक्तींना समज देण्यात आली आहे, असंही पेडणेकर म्हणाल्या. अविघ्न इमारतीमधील 19 व्या मजल्यावर आग लागली होती. त्यामध्ये इमारतीवरुन कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
