मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मध्य रेल्वे वरील लोकल पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होतं आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे वरील लोकल पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होतं आहेत. सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता लोकल वाहतुकीवर बघायला मिळत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास उशिरा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. बदलापूर, कर्जतकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकल पाऊण तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे कामाला जाणाऱ्यांचे हाल होत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
Published on: Jun 19, 2025 05:06 PM
