Rohit Arya Case : बोलून प्रश्न सोडवायला हवा होता, ओलीस ठेवणं चुकीचं – दीपक केसरकर
मुंबईतील पवई येथील महावीर क्लासिक इमारतीमध्ये काल ओलीस नाट्य रंगलं. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दुपारी या मुलांची सुटका करण्यात आली, तर आरोपी रोहित आर्या याचा चकमकीत मृत्यू झाला
मुंबईतील पवई येथील महावीर क्लासिक इमारतीमध्ये काल ओलीस नाट्य रंगलं. वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाला आरोपी रोहित आर्याने ओलीस ठेवले होते. त्याने मुलांना एअरगन आणि केमिकलच्या धाकाने धमकावले. एक व्हिडीओही जारी केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दुपारी या मुलांची सुटका करण्यात आली, तर चकमकीत गोळी लागून आरोपी रोहित आर्या याचा मृत्यू झाला. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याने काही मागण्या केल्या होत्या.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
