Mumbai Coastal Road Breaking : मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ‘या’ महिन्यात होणार पूर्ण
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी विलंब होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या सहा हजारांहून अधिक कामगार या कोस्टल रोडच्या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी ७० टक्के कामगार हे आपल्या गावी सुट्टीवर गेल्याने कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी थोडासा उशीरा खुला होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील लक्षवेधी असणारा कोस्टल रोड संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोस्टल रोडचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मरीन ड्राईव्ह ते पेडर रोडपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस खुला केला जाणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी विलंब होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या सहा हजारांहून अधिक कामगार या कोस्टल रोडच्या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी ७० टक्के कामगार हे आपल्या गावी सुट्टीवर गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी थोडासा उशीरा खुला होण्याची शक्यता आहे.
Published on: May 30, 2024 04:39 PM
