Mumbai Election Chaos: मुंबईत साड्या पेटवल्या, मुंबईत राडा सुरू… चेंबूरमध्ये आचारसंहितेचा भंग, ठाकरे गटाचा शिंदे सेनेवर आरोप
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चेंबूरमध्ये साडी वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यावर साड्या वाटप केल्याचा आरोप आहे. आचारसंहिता लागू असतानाही हा प्रकार घडल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, स्थानिक महिलांनी साड्या जाळून निषेध व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय राडा सुरू झाला आहे. चेंबूर परिसरात शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यावर महिलांना साड्या वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही हा प्रकार घडल्याने तीव्र पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाने या साडी वाटपावर आक्षेप घेतला असून, स्थानिक महिलांनी वाटलेल्या साड्या पेटवून त्यांचा निषेध केला. या घटनेनंतर ठाकरे गटाने आरोप केला की, कामिनी शेवाळे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने हे साडी वाटप केले जात आहे. लोकांची कामे करून ताकद दाखवावी, साड्या वाटून मते मिळत नाहीत, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला स्टंट असून, बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
