Mumbai Rain : 6 हजार कर्मचारी, 10 हजारहून जास्त कॅमेरे; पालिकेची डिजास्टर मॅनेजमेंट टीम सज्ज
Mumbai Rain Updates : पहिल्याच पावसात मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महापालिकेच्या डिजास्टर मॅनेजमेंट टीम प्रयत्न करत आहे.
मुंबईत मान्सूनने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बघायला मिळाला आहे. परिणामी अनेक सखल भागांत पाणी देखील साचलं आहे. या संपूर्ण परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेची डिजास्टर मॅनेजमेंट टीम कशी काम करते याचा आढावा टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.
मुंबईत पहिल्याच पावसाने सामान्य मुंबईकरांचे चांगलेच हाल केलेले आहेत. साचलेल्या पाण्यातून वाट काढत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी वर्गाला कामावर जावं लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत देखील मुंबई महापालिकेच्या डिजास्टर मॅनेजमेंट टीमकडून नागरिकांना पुरेपूर सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठिकाणी 6 हजार कर्मचारी हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तैनात आहेत. तर वेगवेगळ्या भागांत 10 हजारांपेक्षा जास्त कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. ज्यातून मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेता येईल. मुंबईत ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, किंवा नागरिकांना काही समस्या आलेल्या आहेत. त्यांना सोडवण्यासाठी हे कर्मचारी सर्वोतपरी प्रयत्नकरत असल्याचं बघायला मिळत आहे.
