Andheri Subway : मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद

Andheri Subway : मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद

| Updated on: Jun 16, 2025 | 5:47 PM

Mumbai Weather : रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम झालेला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यात पश्चिम उपनगरातील अंधेरी सब वे मध्ये तब्बल पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मुंबई वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सब वे वाहतुकीसाठी बंद केला आहे.

मुंबईत रविवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवारपासून सुरू झालेला हा पाऊस सोमवारी देखील सुरूच होता. याचा सर्वाधिक फटका पश्चिम उपनगरांना बसला असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या परिसरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अंधेरी सब वे हा सखल भाग असल्याने तिथे पाच फुटांपर्यंत पाणी साचले. त्यामुळे वाहने बंद पडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने वाहतूक तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jun 16, 2025 05:47 PM