Mumbai High Tide : समुद्राला उधाण आलं, 4.37 मीटर उंच लाटा उसळणार

Mumbai High Tide : समुद्राला उधाण आलं, 4.37 मीटर उंच लाटा उसळणार

| Updated on: Jun 23, 2025 | 12:34 PM

Weather Alert : मुंबईत समुद्राला भरती आली आहे. भरतीच्या वेळेत समुद्र किनार्‍यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत समुद्राला भरती आली आहे. आज 4.37 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच मुंबईत मरिन ड्राइव्ह भागात समुद्र खवळलेला बघायला मिळाला आहे. मुंबईकरांना दुपारी 2.33 ला भरतीच्या वेळेत समुद्र किनार्‍यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीच्या वेळेस 4.37 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. आज मरीन ड्राईव्ह, वांद्रा वरळी सी लिंक वर समुद्राला उधाण आलेलं चित्रं पहायला मिळालं आहे. तरुणाईने रिमझिम पावसात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राईव भागात गर्दी केलेली आहे. दरम्यान, यावेळी समुद्र किनारी अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. तर समुद्र खवळलेला असून उंच लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत.

Published on: Jun 23, 2025 12:33 PM