Mumbai Local Megablock : उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही

Mumbai Local Megablock : उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही

| Updated on: Nov 15, 2025 | 12:50 PM

उद्या रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉग घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेकडून मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल. या काळात करी रोड, चिंचपोकळी आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेगाब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Nov 15, 2025 12:50 PM