Mharashtra Lockdown | आजपासून दोन लस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास

| Updated on: Aug 15, 2021 | 9:02 AM

कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरल्यामुळे मुंबईसह राज्यभरात रविवारपासून निर्बंध शिथील होतील. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही.

Follow us on

आजपासून दोन लस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास. काही महिन्यांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरल्यामुळे मुंबईसह राज्यभरात रविवारपासून निर्बंध शिथील होतील. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. तसेच शनिवारी दिवसभरात महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण झाले. कालच्या एका दिवसात रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख आणि मुंबईत 1.51 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार रविवारपासून सामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असावेत, अशी अट घालण्यात आली आहे.