Mumbai Breaking | मुंबई पालिकेचं मान्सूनपूर्व आढावा बैठक, नालेसाफाईच्या कामांवर चर्चा
मुंबई पालिकेची मान्सूनपूर्व आढावा बैठक, नालेसाफाईच्या कामांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
मुंबई पालिकेची मान्सूनपूर्व आढावा बैठक, नालेसाफाईच्या कामांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या काही भागात नालेसफाई अजून झालेली नाही , तसेच मुंबई पावसाळ्यात पालिका कस काम करणार याचा आढावा या बैठकित घेतला जाणार आहे. मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
