VIDEO : ‘रामाचा धनुषही आमच्याकडे, हनुमानाची गधाही आमच्याकडे’ – Sanjay Raut
प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले. राऊतांनी शनिवाटी पंचवटी येथील सप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले, आरती केली.
प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले. राऊतांनी शनिवाटी पंचवटी येथील सप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले, आरती केली. यावेळी शिवसैनिकांनी जय श्रीरामची जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
