मुंबईत ठाकरे – शिंदेंचे कार्यकर्ते भिडले! व्हिडीओ आला समोर
मुंबईतील प्रभादेवीत सुशोभीकरण प्रकल्पाबाबत ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. दोन्ही गटांनी कामाची वर्क ऑर्डर स्वतःकडे असल्याचा दावा केला. ठाकरे गटाने काम थांबवल्याने हा वाद निर्माण झाला. याआधीही दोन्ही गटांमध्ये वाद झाले आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एका सर्कलच्या सुशोभीकरण प्रकल्पाबाबत आमनेसामने आले. दोन्ही गटांनी या कामाची वर्क ऑर्डर स्वतःकडे असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम थांबवल्याने हा वाद अधिक चिघळला. स्थानिक आमदार म्हणून ठाकरे गटाचे महेश सावंत तर आधी शिंदे गटाचे सदा सर्वणकर होते. हा वाद दादर पोलीस ठाण्यात पोहोचला असून, पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 2022 मध्येही प्रभादेवीत गणपती उत्सवावेळी दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक महत्त्वाचा बनला आहे.
Published on: Sep 13, 2025 12:11 PM
