Mumbai Rain Update : मेट्रोच्या भुयारी स्थानकातून वाहतेय नदी अन् पायऱ्यांचा धबधबा, पहिल्याच पावसात मेट्रोला मोठा फटका

Mumbai Rain Update : मेट्रोच्या भुयारी स्थानकातून वाहतेय नदी अन् पायऱ्यांचा धबधबा, पहिल्याच पावसात मेट्रोला मोठा फटका

| Updated on: May 26, 2025 | 2:56 PM

मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई मेट्रो तीनच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या टप्पा क्रमांक २ अ च्या वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात पावसाचं पाणी शिरल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबई एक्वा लाईन मेट्रोलाही बसला आहे. वरळीच्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी साचलं असल्याचे पाहायला मिळाले. वरळीच्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी शिरल्याने मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वरळीच्या भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचल्याने स्टेशन परिसराला नदीचं स्वरूप आल्याचे पाहायला मिळतंय तर मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे त्या पायऱ्यांना धबधब्यांचे रूप आलंय. दरम्यान, आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास झालेल्या मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर वरळीच्या भुयारी स्थानकात पाणी साचलं आणि त्यामुळे मुंबई मेट्रो तीन हा प्रकल्प वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 26, 2025 02:56 PM