Pahalgam Attack : हल्ल्यावेळी ‘अल्लाह-हू-अकबर’ बोलणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा

Pahalgam Attack : हल्ल्यावेळी ‘अल्लाह-हू-अकबर’ बोलणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा

| Updated on: Apr 30, 2025 | 2:12 PM

दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा मुजम्मिल घरी आला तेव्हा तो खूप घाबरला होता आणि कोणाशीही बोलला नाही. असे त्याचा भाऊ मुख्तार याने सांगितले. यापूर्वीही २३ एप्रिल रोजी मुजम्मिलची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. पर्यटक ऋषी भट्ट यांनी केलेल्या दाव्यानंतर, एनआयए पुन्हा त्याची चौकशी करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, २८ एप्रिल रोजी झिपलाइन ऑपरेटर मुझम्मिलचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये तो अल्लाहू अकबरचा नारा देत असल्याचे दिसून आले. यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून मंगळवारी झिपलाइन ऑपरेटरची चौकशी करण्यात आली. तर अल्लाहू अकबर असं म्हणणं स्वाभाविक असल्याचे या चौकशीदरम्यान ऑपरेटर मुजम्मिल याने म्हटलं आहे. तर ऑपरेटरच्या सुरूवातीच्या चौकशीनंतर मुजम्मिलवर कोणताही संशय नसल्याचे एनआयएकडून सांगितले जात आहे. अशातच पहलगाम येथे झिपलाइन ऑपरेटर असणारा मुजम्मिल याच्या वडिलांनी Tv9 मराठीशी बोलताना मोठा दावा केला. मुजम्मिलची काही चूक नाही. माझ्या मुलाची चूक असल्यास लिहून द्यायला तयार आहे. जेव्हा कोणती आपत्ती येते तेव्हा आम्ही ‘अल्लाह-हू-अकबर‘ बोलतो. यासह त्यांनी असंही दावा केला की, ज्यावेळी पर्यटक झिपलाइन करतो त्या प्रत्येक पर्यटकांच्या वेळी आम्ही ‘अल्लाह-हू-अकबर’ असं बोलतो.

Published on: Apr 30, 2025 02:12 PM