MVA-MNS Alliance : …मग निवडणूक का वेगळी लढता? पवार यांचा थेट सवाल, मविआ अन् मनसेची युती होणार?

MVA-MNS Alliance : …मग निवडणूक का वेगळी लढता? पवार यांचा थेट सवाल, मविआ अन् मनसेची युती होणार?

| Updated on: Nov 21, 2025 | 2:47 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. शरद पवार महाविकास आघाडीत मनसेला सामील करण्याबाबत सकारात्मक असल्याचे कळतंय.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आणण्यासाठी आणि महाविकास आघाडीत मनसेला सामील करून घेण्यासाठी सकारात्मक आहेत. मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाव्यात, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मतदार यादीतील घोळासंदर्भात सर्व पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढतात, मग निवडणुका स्वतंत्रपणे का लढतात, असा सवालही केल्याचे कळते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली तर दुसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका मविआ म्हणून लढली पाहिजे, असे पवारांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या विरोधात एकत्र मोर्चा काढता, मग निवडणूक वेगळी का लढता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मविआमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याबाबतही पवार सकारात्मक असल्याचे कळते.

Published on: Nov 21, 2025 02:47 PM