Rohini Khadse : रोहिणी खडसेंनी थेट रूपाली चाकणकरांवर ओढले ताशेरे
Rohini Khadse On Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड उठली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.
महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश दिला गेलेला नाही. फक्त रोहिणी खडसे यांना राजभवनात प्रवश देण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बदलून दिल्या जाव्यात अशी मागणी विरोधक महिला नेत्या करत आहेत. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाची महत्वाची बैठक निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मविआच्या महिलांच्या शिष्टमंडळाकडून टीका केली जात असून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढले आहे.
Published on: Jun 03, 2025 01:15 PM
