Ajit Pawar NCP : अजित पवारांना मोठा धक्का! 7 आमदारांनी सोडली साथ

Ajit Pawar NCP : अजित पवारांना मोठा धक्का! 7 आमदारांनी सोडली साथ

| Updated on: Jun 01, 2025 | 11:08 AM

NCP MLAs join NDPP In Nagaland : तब्बल संत आमदारांनी साथ सोडल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसलेला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला नागालँडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित दादांची साथ सोडत नागालँडमधील नॅशनल डेमोक्रेटिव प्रोग्रेसिव पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

नागालँड युनिटने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत, एनडीपीपी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र आता नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले आहेत. 60 सदस्यांच्या विधानसभेत यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. तर अजित पवार यांच्या नागालँडमधील आमदारांची संख्या आता 0 झाली आहे. त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.

Published on: Jun 01, 2025 11:07 AM