Nagpur BJP : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त, काय केली मागणी?

Nagpur BJP : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त, काय केली मागणी?

| Updated on: Dec 29, 2025 | 2:47 PM

नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाग १५ मधील उमेदवारांच्या बदलाची मागणी केली. बावनकुळेंनी यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, नागपुरात भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादीशी जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नाराज कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धडक दिली. याचवेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तेथे बैठकीसाठी उपस्थित होते. संतप्त कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना घेरून आपली नाराजी व्यक्त केली. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याच्या मुद्द्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी होती. त्यांनी विशेषतः प्रभाग १५ मधील दोन्ही महिला उमेदवारांना बदलण्याची मागणी केली. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि “बोलतोय बोलतोय” असे सांगितले.

दरम्यान, बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना युती होणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेससोबतही चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील त्यांच्या सिटिंग जागा आणि काही वाढीव जागांची मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी पाच प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

Published on: Dec 29, 2025 02:47 PM