Devendra Fadnavis : प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल – मुख्यमंत्री

Devendra Fadnavis : प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल – मुख्यमंत्री

| Updated on: Jul 13, 2025 | 3:30 PM

नागपुरात प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या सात मजली इमारतीची भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं.

नागपूरची फोरेन्सिक लॅब अद्यावत झाली पाहिजे, 2027 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. क्रिमिनल जस्टिसमध्ये फॉरेन्सिक लॅबचा महत्व मोठं आहे. आता विक्षित गुन्ह्यात फॉरेसिक पुरावे गोळा करणे अनिवार्य झालं आहे. फॉरेन्सिक पुरावे होस्टाईल होत नसल्याने दोषीला वेगाने शिक्षा होण्यासाठी फॉरेन्सिक महत्वाचे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.  नागपुरात प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या सात मजली इमारतीची भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या अद्यावत प्रयोग शाळेच्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अहवालासाठी लागणारा विलंब कमी होईल. तसेच तपासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.. या ठिकाणी अद्यावत तंत्रज्ञानाच्या साह्याने गुन्ह्यांचा तपास करण्यास प्रयोगशाळेत केले जाणार आहे.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सायबर फॉरेन्सिक व्यवस्था निर्माण केली आहे.. किंबहुना अनेक राज्यातील लोक आपल्याकडे येऊन लॅब करून द्या अशी मागणी करत आहे. आपण अन्य राज्यात जाऊन काम करत आहे. गुन्हेगाराचा दोन पाऊल पुढे जाऊन आपल्याला काम करायचे आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Published on: Jul 13, 2025 03:30 PM