Bachchu Kadu : बच्चू कडूंचा नागपुरात एल्गार, सरकारला आज दुपारी 12 पर्यंतचा अल्टीमेटम; आता महामार्ग ठप्प नंतर….
शेतकरी कर्जमाफी, घरकुलांसाठी अनुदान आणि धान्याला हमीभाव यांसारख्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी नागपुरात विराट ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या आंदोलनामुळे चार महामार्ग जाम झाले असून, आज दुपारी १२ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. शेतकरी दीड महिन्याचे राशन सोबत घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विराट ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, यामुळे नागपूर-जबलपूर, नागपूर-वर्धा आणि नागपूर-हैदराबाद यांसह चार प्रमुख महामार्ग ठप्प झाले आहेत. जामठा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे.
ग्रामीण भागातील घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान, शेतकऱ्यांची कर्जमाफी, धान्याला योग्य हमीभाव आणि दूध भेसळ रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बच्चू कडूंनी सरकारला आज दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला असून, तोपर्यंत चर्चेचा प्रस्ताव न आल्यास रेल्वे मार्गही रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. अनेक शेतकरी एक ते दीड महिन्याचे राशन घेऊन आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
