नागपुरात सुपर मॉम ठरलेल्या कॉलरवाल्या वाघीणीचा मृत्यू

नागपुरात सुपर मॉम ठरलेल्या कॉलरवाल्या वाघीणीचा मृत्यू

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 5:26 PM

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिवनी जंगलातील कॉलरवाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी जंगलात अधिकाऱ्यांना ती मृतावस्थेत आढळली.

नागपूरः मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिवनी जंगलातील कॉलरवाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी जंगलात अधिकाऱ्यांना ती मृतावस्थेत आढळली. 2008 ते 2019 या 11 वर्षांच्या काळात तिने तब्बल 29 बछड्यांना जन्म दिला. टी 15 तसेच पेंचची राणी या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या वाघिणीचा वयाच्या 17 व्या वर्षी मृत्यू झाला. तसे तर ती वृद्धावस्थेत पोहोचली होती, मात्र एका सवयीमुळे तिचे आरोग्य बिघडले आणि शनिवारी तिचा मृत्यू झाला, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.