Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव

Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव

| Updated on: Jul 13, 2026 | 1:54 PM

नालासोपारा परिसरात नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाच्या श्रेयवादावरून संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत "गो बॅक" च्या जोरदार घोषणा दिल्या.

नालासोपारा परिसरात नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाच्या श्रेयवादावरून संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत “गो बॅक” च्या जोरदार घोषणा दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या काळात स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, या संपूर्ण परिस्थितीत नगरसेविका प्रज्ञा पाटील कुठेही दिसल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला.

दरम्यान, पूरस्थिती ओसरल्यानंतर आणि विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठीच त्या परिसरात आल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी त्यांना घेराव घालत घोषणाबाजी केली, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात श्रेयवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या संतापाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 13, 2026 1:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us