Namdev Shastri Video :  देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर नामदेव शास्त्रींचं ‘ते’ वक्तव्य अजाणतेपणामुळे? टीकेची झोड उठताच यु-टर्न

Namdev Shastri Video : देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर नामदेव शास्त्रींचं ‘ते’ वक्तव्य अजाणतेपणामुळे? टीकेची झोड उठताच यु-टर्न

| Updated on: Mar 05, 2025 | 1:26 PM

मारेकऱ्यांची मानसिकता माध्यमांनी का समजून घेतली नाही? असा धक्कादायक सवाल शास्त्रींनी केला होता. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख हत्येच्या दीड ते दोन महिन्यांनंतर महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी देशमुखांची हत्या मारेकऱ्यांनी का केली? मारेकऱ्यांची मानसिकता माध्यमांनी का समजून घेतली नाही? असा धक्कादायक सवाल शास्त्रींनी केला होता. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही वक्तव्य हे अजाणतेपणे होतात. आधी केलेलं वक्तव्य ते थोडसं अजाणतेपणाचं होतं’, असं म्हणत महंत नामदेव शास्त्री सानप यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘जेव्हा धनंजय देशमुख कुटुंब भगवानगडावर आलं त्यानंतर त्यांनी मला त्या प्रकरणाची जाण करून दिली. त्यानंतर मला त्याची जाणीव होऊ माझं अंतःकरण हेलावलं. न्यायालयाला माझी प्रार्थना आहे की आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. हत्येचं कोणीही समर्थन करत नाही.’, असे म्हणत असताना भगवानगड पीडित कुटुंबाच्या कायम पाठिशी असल्याचा नामदेव शास्त्रींनी शब्द दिला. दरम्यान, या आधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, घटनेचं कौर्य माहिती नव्हतं म्हणून तसं वक्तव्य केलं गेलं. पण नंतर त्याची जाण झाली. अजाणतेपणाने माझ्याकडून ते वक्तव्य करण्यात आल्याचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं.

Published on: Mar 05, 2025 01:25 PM