आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात नाना पटोले यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले…

| Updated on: Aug 09, 2023 | 1:05 PM

देशभरात आदिवासी दिन साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आज नाशिक शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. एका कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील उपस्थित राहिले.

Follow us on

नाशिक, 09 ऑगस्ट 2023 | देशभरात आदिवासी दिन साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आज नाशिक शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले असून एका कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील उपस्थित राहिले. नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, “आज देशभरात आदिवासी दिन साजरा केला जात आहे. नाशिकमध्ये मोठ्याप्रमाणात आदिवासी समाज राहतात. केंद्रात जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, त्यानंतर सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली सुरु आहे. आदिवासी बांधवांच्या अधिकारावर घाला मोदी सरकार घालत आहे. म्हणून आदिवासींच्या हक्काची लढाई काँग्रेस वेळोवेळी लढत आली आहे. खरंतर नाशिक ही क्रांती भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य लढाच्या लढाईत नाशिक विभागाचं योगदान आहे. संविधानाला वाचवण्याचं युद्ध सुरू आहे.”