Nana Patole : मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही; नाना पटोलेंची अधिवेशनात आक्रमक भूमिका

Nana Patole : मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही; नाना पटोलेंची अधिवेशनात आक्रमक भूमिका

| Updated on: Jul 01, 2025 | 1:19 PM

Maharashtra Assembly Session : नाना पटोले यांनी आज सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी आज सभागृहात उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पटोले हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यात कालपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे हे सातत्याने राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. हा अपमान शेतकरी क्षण करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी असंसदीय शब्दाचा वापर केल्याचे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 5 मिनिटांसाठी सभा तहकूब केली. नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी सभागृहात केली होती. नाना पटोले, विजय वडेट्टीवर थेट अध्यक्षाच्या डायसवर चढून राजदंडापुढे जाऊन लोणीकर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची केली मागणी.

Published on: Jul 01, 2025 01:09 PM