छगन भुजबळ यांच्यामागे कुणाचं बळ? विरोधकांचं बोट भाजपकडे, कुणी काय केले आरोप?

छगन भुजबळ यांच्यामागे कुणाचं बळ? विरोधकांचं बोट भाजपकडे, कुणी काय केले आरोप?

| Updated on: Nov 22, 2023 | 10:28 AM

छगन भुजबळ यांना भाजपचं स्क्रिप्ट देऊन जातीय तेढ निर्माण करत आहे, असा आरोप विरोधक करू लागलेत. आधी नाना पटोले, त्यानंतर रोहित पवार यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. तर आपल्याला कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचे म्हणत भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात हल्लाबोल केल्याने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसात भुजबळांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. त्यामुळे विरोधकांनी भाजपवरच हल्लाबोल केलाय. भुजबळांना भाजपचं स्क्रिप्ट देऊन जातीय तेढ निर्माण करत आहे, असा आरोप विरोधक करू लागलेत. आधी नाना पटोले, त्यानंतर रोहित पवार यांनी भुजबळांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. तर आपल्याला कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचे म्हणत भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. जेव्हापासून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भुजबळ यांनी भूमिका घेतली आहे. तेव्हापासून आजपर्यंत भुजबळांनी फडणवीसांचा बचाव केला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यामागे भाजपचं बळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जालन्यातील लाठीचार्जनंतर गृहमंत्री फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 22, 2023 10:28 AM