Nanded | नांदेडमध्ये दिवसभरात तब्बल 55 हजार नागरिकांचे लसीकरण, जिल्हाधिकाऱ्यांकडून मोहीम

Nanded | नांदेडमध्ये दिवसभरात तब्बल 55 हजार नागरिकांचे लसीकरण, जिल्हाधिकाऱ्यांकडून मोहीम

| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 8:58 AM

नांदेड जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 55 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आलीये. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गणेशोत्सव तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने लसीकरणाची विशेष मोहीम राबवली, त्याला जिल्ह्यात जोरदारपणे प्रतिसाद मिळालाय.

नांदेड जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 55 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आलीये. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गणेशोत्सव तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने लसीकरणाची विशेष मोहीम राबवली, त्याला जिल्ह्यात जोरदारपणे प्रतिसाद मिळालाय. ग्रामीण भागात सर्वाधिक चाळीस हजार नागरिकांचे लसीकरण एकाच दिवसात पूर्ण झालेय, तर नांदेड शहरात पाच हजार आणि जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत दहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलंय. विशेष म्हणजे दुर्गम आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यात लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळालाय.