Nanded Farmers | नुकसानीची व्यथा सांगताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर

| Updated on: Sep 15, 2021 | 1:24 PM

चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राऊबाई यांचं साडेतीन एकरवरील सोयाबीन वाहून गेलं.  स्वतःच्या लेकरा प्रमाणं जपलेलं पिकं क्षणार्धात वाहून गेल्यानं. राऊबाईंचे अश्रु अनावर झाले.

Follow us on

नांदेडमध्ये रडणाऱ्या एका महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. व्हिडीओत दिसणारी महिला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पोखर्णी गावची राऊबाई चाटे आहे. राऊ बाई पती आणि विधवा सुनेसह राहतात.  चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राऊबाई यांचं साडेतीन एकरवरील सोयाबीन वाहून गेलं.  स्वतःच्या लेकरा प्रमाणं जपलेलं पिकं क्षणार्धात वाहून गेल्यानं. राऊबाईंचे अश्रु अनावर झाले. खरीप पिकांवर बळीराजांच वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून असतं मात्र, हजारो रुपये खर्च करुनही आता हाती काहीच लागणार नाही म्हणून राऊबाईनं हंबरडा फोडला. जिल्हयात पावसानं हाहाकार माजवल्यानं अनेक शेतकऱ्यांची अवस्था राऊबाई प्रमाणं झालीय.. त्यामुळे पिकं विम्यावर भरवसा राहिला नसल्यानं मायबाप सरकार च्या मदतीकडे बळी राजाचे डोळे लागले आहेत.