Nanded Flood : पुरामुळं पिकं वाहून गेली, सगळं संपलं… महिलांचा आक्रोश, अश्रू थांबेना म्हणाल्या, लाडक्या भावांनी…

Nanded Flood : पुरामुळं पिकं वाहून गेली, सगळं संपलं… महिलांचा आक्रोश, अश्रू थांबेना म्हणाल्या, लाडक्या भावांनी…

| Updated on: Sep 27, 2025 | 1:28 PM

नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथे मुसळधार पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पीक पाण्याखाली गेले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे महिलांनी आक्रोश केला असून, लाडक्या भावांनी नातं पाळावं अशी आर्त हाक त्यांनी सरकारला दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी शिवारात मुसळधार पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराने शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांनी लावलेली पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे संतप्त महिलांनी आपला आक्रोश व्यक्त करत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. लाडक्या भावांनी नातं पाळावं अशी आर्त हाक देत त्यांनी शासनाला आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी एका एकरासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि आता काढणीला आलेले पीक पाण्यात गेल्याने ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. “आमचे लेकरं-बाळं कशी जगायची?” असा सवाल करत त्यांनी त्यांच्या पुढील जीवनमानाबद्दल चिंता व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून, मायबाप सरकारने तातडीने मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

Published on: Sep 27, 2025 01:28 PM