गडी साधासुधा नाही, मका खातो, गहू खातो, या फायटर कोंबड्याची किंमत मोबाईलपेक्षा लैच ज्यादा

गडी साधासुधा नाही, मका खातो, गहू खातो, या फायटर कोंबड्याची किंमत मोबाईलपेक्षा लैच ज्यादा

| Updated on: Jan 12, 2024 | 6:29 PM

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावातील बाबुराव मुंडे यांच्या कोंबड्यांनी नांदेडमधील माळेगाव यात्रेत हजेरी लावली. सोबतच या यात्रेत पशू प्रदर्शनात प्रथम क्रमांक ही पटकावला. ह्या कोंबड्यांच्या जोड्याची किंमत तब्बल २० हजार...

नांदेड, १२ जानेवारी, २०२४ : नांदेडच्या माळेगावमधील यात्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण ही यात्रा अनोखी असून या यात्रेत पशू प्रदर्शनही सुरू आहे. यात एका कोंबड्याने सर्व उपस्थितांचं लक्ष वेधलं असून हा कोंबडा चर्चेचा विषय ठरला आहे. या कोंबड्याने माळेगाव यात्रेतील पशू प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावातील बाबुराव मुंडे यांच्या कोंबड्यांनी नांदेडमधील माळेगाव यात्रेत हजेरी लावली. सोबतच या यात्रेत पशू प्रदर्शनात प्रथम क्रमांक ही पटकावला. ह्या कोंबड्यांच्या जोड्याची किंमत तब्बल २० हजार असल्याचे बाबुराव मुंडे यांनी सांगितले. या कोंबड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोंबडा फायटर असून काही विशेष फाईटसाठी या कोंबड्यांना ट्रेन केल जातं. या कोंबड्यांचे वय आठ महिने असून उंची अडीच फूट आहे. सोबतच या कोंबडायांना नियमीतपणे शेंगदाणे, मका, ज्वारी, गहू, हरभरा, तांदूळ हे सर्व एकत्र करून याचा खुराक करून खायला दिला जातो. त्यामुळे हा कोंबडा पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दीही करतात. दरम्यान या कोंबड्याला विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी २० हजार रुपयांची किंमत मोजावी लागेल, असं बाबुराव मुंडे यांनी सांगितलं आहे.

Published on: Jan 12, 2024 06:28 PM