Nanded Video :  बाबा हा काय प्रकार… झोपलेला रूग्णाच्या अंगा-खांद्यावर उंदराचा धुमाकूळ, VIDEO तुफान व्हायरल

Nanded Video : बाबा हा काय प्रकार… झोपलेला रूग्णाच्या अंगा-खांद्यावर उंदराचा धुमाकूळ, VIDEO तुफान व्हायरल

| Updated on: Aug 01, 2025 | 11:13 AM

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या.

नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा उपद्रव वाढल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा मोठा वावर असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावर उंदराचा वावर असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे. तर रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या काही दिवसापासून नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील शासकीय रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये शासकीय रूग्णालयात उंदरांचा सुळसुटाळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले आहे.

Published on: Aug 01, 2025 11:13 AM