धक्कादायक! स्कूल बस दरीत कोसळली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमधील देवगोई घाटाजवळ स्कूल बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. सुमारे 100 ते 150 फूट खोल दरीत बस कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर 25-30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाटाजवळ एक स्कूल बस सुमारे 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागातून विद्यार्थ्यांच्या नवीन सत्रासाठी त्यांना शाळेत घेऊन जात असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि सातपुड्याच्या खराब रस्त्यांमुळे बस दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृत्यू आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Nov 09, 2025 04:39 PM
