Narayan Rane | निवडणुकीसाठी अर्थमंत्री येतात, पराभूत होऊन जातात; अजित पवारांना टोला

| Updated on: Dec 31, 2021 | 5:18 PM

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखिळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती, मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

Follow us on

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखिळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती, मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी नाणेंना आता पुढचं टार्गेट हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्रातील सत्ता असेल असेही सांगितले आहे. ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.