Video | नीलम राणे, नितेश राणेंना लुकआऊट सर्क्युलर, डीएचएफएल कंपनीच्या तक्रारीनंतर कारवाई

| Updated on: Sep 09, 2021 | 7:06 PM

 केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Follow us on

पुणे : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत.