Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द, मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द, मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 9:17 AM

नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती. भाजपनं अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं.