Nashik BJP : नाशिक भाजपमध्ये AB फॉर्मवरून तीव्र नाराजी, कार्यकर्त्यांकडून थेट जिल्हाध्यक्षांचा पाठलाग

Nashik BJP : नाशिक भाजपमध्ये AB फॉर्मवरून तीव्र नाराजी, कार्यकर्त्यांकडून थेट जिल्हाध्यक्षांचा पाठलाग

| Updated on: Dec 30, 2025 | 2:50 PM

नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमधील तीव्र नाराजी उफाळून आली आहे. एबी फॉर्म वाटपात निष्ठावंतांना डावलल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांचा पाठलाग केला. मुंबई-आग्रा महामार्गावर गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत, कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराचे गेटही तोडले. यामुळे पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकीसाठी एबी फॉर्म मिळण्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांचा पाठलाग केला. शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करत निष्ठावान कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा मुंबई-आग्रा महामार्गावर पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून, अनेकांना अपेक्षित तिकीट मिळाले नसल्यामुळे त्यांच्यात संताप आहे.

वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा तोल ढासळल्याचे दिसून आले. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि तिकीट वाटपातील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Published on: Dec 30, 2025 02:50 PM