Nashik Civic Polls : नाशकात शिंदेंची सेना अन् दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार; नाशिक महापालिकेत कोण कोणासोबत?

| Updated on: Dec 30, 2025 | 10:56 AM

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राजकीय आघाड्या स्पष्ट झाल्या आहेत. शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी आणि मनसे हे एकत्र येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (भाजप) नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मेरीटनुसार जागावाटप होईल, असेही झिरवाळ यांनी सांगितले. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र आघाडी करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

Published on: Dec 30, 2025 10:56 AM