Igatpuri Rain : इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
नाशिक शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. इगतपुरीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुर स्थिती निर्माण झालेली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस बरसात आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी भरलं आहे. यातच गोदावरी नदीच्या पत्रात एका पर्यटकाची कार अडकली आहे. कार पूर्ण पाण्यात गेलेली असल्याने ही कार बाहेर काढता येणं शक्य नसल्याने आता पर्यटकाने ही कार दोरखंडाने बांधून ठेवलेली आहे. ही कार गोदावरी नदीच्या पत्रात पार्क करण्यात आलेली होती. मात्र त्याचवेळी पत्रात अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही कार या पाण्यात बुडाली आहे. या पाण्याचा प्रवाह आणि वेग अधिक असल्याने कार वाहून जाऊ नये म्हणून स्थानिक तरुणांनी ही कार बांधून ठेवण्यात आली आहे.
Published on: Jun 19, 2025 05:55 PM
