निवडणुकीच्या निकालाआधी शुभांगी पाटील tv9 मराठीवर, पाहा Exclusive मुलाखत…

निवडणुकीच्या निकालाआधी शुभांगी पाटील tv9 मराठीवर, पाहा Exclusive मुलाखत…

| Updated on: Feb 02, 2023 | 8:02 AM

नाशिक पदवीधर निवडणुकीसह अन्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल आहे. या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. पाहा त्या काय म्हणाल्यात...

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीसह अन्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल आहे. या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. “जनतेचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. विशेषत: महिलांचा पाठिंबा मला आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. समोर कोण प्रतिस्पर्धी आहे याचा मी कधीच विचार केला नाही. कारण मला जनतेची कामं करायची आहेत. त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. मतमोजणी तर केवळ औपचारिकता आहे. निकाल स्पष्ट आहे. विजय आपलाच आहे”, असं शुभांगी पाटील म्हणाल्यात.

Published on: Feb 02, 2023 08:02 AM