मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील TCS BPO कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान असल्याचं समोर आलं होतं.
नाशिकमधील TCS BPO कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान असल्याचं समोर आलं होतं. कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकारी जसे की, तौसीफ अत्तार आणि दानिश शेख पदाचा गैरवापर करून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्म बदलण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.
या प्रकरणावर आज विधान परिषदेत चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून त्यामध्ये TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचाही समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “या प्रकरणाच सखोल तपास सुरु असून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात मॅनेजरवर सर्वांत गंभीर गुन्हा आहे. इतकेच नाही तर मी निष्चीतपणे सांगू इच्छीतो, TCS कंपनीचा याप्रकारात इंव्होलमेंट नाही, त्या कंपनीने पोलिस प्रशासनाला तपासात संपूर्ण सहकार्य केलं आहे.”
