Nashik : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी

Nashik : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी

| Updated on: Jul 06, 2025 | 3:03 PM

Someshwari Waterfall : राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा आज सकाळपासूनच बसलेला असून नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी सुट्टीमुळे धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात, मुंबईसह विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार, नालासोपारा यासह अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, कोल्हापूर आणि घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jul 06, 2025 03:03 PM