राजकारणात असभ्य भाषा वापरता कामा नये, पण राऊत बोलले ते खरंच; ‘या’ नेत्याचा ओपन सपोर्ट

राजकारणात असभ्य भाषा वापरता कामा नये, पण राऊत बोलले ते खरंच; ‘या’ नेत्याचा ओपन सपोर्ट

| Edited By: | Updated on: Feb 20, 2023 | 12:00 PM

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्या नंतर राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

नाशिक : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्यावर ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळालं. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही”, असं सुधाकर बडगुजर म्हणालेत. “राजकारणात अशी भाषा वापरायला नको हे खरं आहे. पण राऊतसाहेब जे बोलले ते खरंच आहे. सध्या लाचारीचं राजकारण सुरू आहे. राऊतांना नाशिकमध्ये फिरू देणार नाही, असं म्हणणारे खूप जण येऊन गेले. त्यांना आम्ही घाबरत नाही”, असंही सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.

Published on: Feb 20, 2023 12:00 PM