Arun Haldar | समीर वानखेडेंनी सर्व पुरावे दिले : अरुण हलदर

Arun Haldar | समीर वानखेडेंनी सर्व पुरावे दिले : अरुण हलदर

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 8:27 PM

काही लोक कुटुंबावर जातीवरून अटॅक करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही शेड्यूल कास्टचे आहात का? असं मी वानखेडेंना विचारलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं. तसेच काही पुरावेही सादर केले, असं त्यांनी सांगितलं.

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतर केलं नाही असं सकृतदर्शनी दिसून येतं, असं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांनी आज भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा केली. वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिलं. त्यानंतर हलदर यांनी मीडियाशी बोलताना वानखेडे यांनी धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट केलं. काही लोक कुटुंबावर जातीवरून अटॅक करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही शेड्यूल कास्टचे आहात का? असं मी वानखेडेंना विचारलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं. तसेच काही पुरावेही सादर केले, असं त्यांनी सांगितलं.